Skip to main content

Posts

सर जोन प्रिन्सेप

 जगात अनेक संशोधक होउन गेले त्याना नोबेल पुरस्कार मिळाले कारण त्याच्या संशोधना मुळे मानवी जीवनात अमुलाग्र बद्ल झाला . सर जेम्स प्रिन्सेप यानी सम्राट अशोक आणि त्यांची धम्मलिपी चा शोध लावला की त्यांच्या शोधा मुळे मानवी जीवनात सामाजीक व धर्मीक बाबतीत अमुलाग्र बदल घडून आले.सर जेम्स प्रिन्सेप   यांचा जन्म 20 ऑगस्ट ,1799 इंग्लंड  येथे झाला.त्याच्या आइचे नाव सोफिया व वडिलांचे नाव जॉन होते ,ते आपल्या आई वडिलांचे दहावे अपत्य होते.त्यांचे वडील भारतात 1771 ला मर्चेंट म्हणून आले वअमाप पैसा कमविला कारण ते व्यवसायिक होते, तसेच त्यांची भारताच्या पार्लिमेंट मधे उच्च अधिकारी म्हणून काम केले,म्हणून त्याना असे वाटायचे की,माझ्या मुलाने सुद्धा भारतात जावे व अमाप पैसा कमवावा.परंतु जेम्स ला इंजीनियरिंग व आर्किटेक्चर मधे रुची होती. त्याची ट्रेनिंग पुर्ण झाल्या नन्तर त्याला कोलकत्ता च्या मिंट मधे15 सप्टेंबर ,1819 ला अच्छे मास्तर म्हणून नोकरी मिळाली,त्या वेळी त्याचे वय केवळ 20 वर्षे होते. त्याचे काम बघून त्याची बदली वाराणसी येथे करण्यात आली.त्याचे काम नाणे वर नव नवीन डिझाइन्स करणे व त्या निर्...

कविता - असा मी...

कविता - असा मी... असा मी कसा मी, असा कसा मी, माझे मलाच कळले नाही, माझे असूनही गाव अनोळखी, मन माझे तिकडे वळलेच नाही. असा मी कसा मी......... मी भटकत राहिलो अनवाणी, कुणी घोटभर पाणीसुद्धा दिले नाही.  मी तडफडत राहिलो वेदनेने, कुणी जवळ सुध्दा आले नाही. असा मी कसा मी......... ते मारत राहिले मला, गुन्हेगार समजून, मी मेलो भुकेल्या पोटी, कुणाचेच काही अडले नाही. माझा माझा म्हणणारे, कुणीच रडले नाही.  आप्त सारे दूर निघून गेले, परक्यांनी जेव्हा स्मशानात नेले, दुर्दैव माझे असे की सरणही होते ओले. असा मी कसा मी.........

कविता - पोरगा झाला

कविता - पोरगा झाला. पोरगा झाला, पोरगा झाला. घरदार नाचलं तुफान.  माय रडली मनात, किती पोरी पोटात दफन. किती देवांना नवस, पोराची हौस घरादाराला. बाई सुकून गेली नित्याचे दमन, माय रडली मनात, किती पोरी पोटात दफन. वंश घराण्याला मिळाला, बाईला हायसे वाटले. आता होणार नाही गर्भपात, मनी अश्रू दाटले,  सुखदुःखाचे.

कविता - त्यांनी.....

कविता -  त्यांनी..... त्यांनी घोषणा केल्या, त्यांनी आश्वासने दिली, त्यांनी जमिनी घेतल्या, त्यांनी जंगले तोडली, त्यांनी विस्थापन केले, त्यांनी नद्या आडवल्या, त्यांनी धरणे बांधली, त्यांनी महामार्ग बांधले, त्यांनी दंगली घडविल्या, त्यांनी समाजात दुफळी निर्माण केली, त्यांनी शिक्षण महाग केले, त्यांनी प्रदूषण वाढविले, त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला, त्यांनी खाजगीकरण केले, त्यांनी भांडवलशाही आणली, कशासाठी?  विकासासाठी! पण कोणाच्या ते मात्र आजपर्यंत सांगितले नाही.

कविता - उडदामाजी काळे गोरे

 कविता - उडदामाजी काळे गोरे कालचे चोर आजचे साव, कालचे रंक आजचे राव. कालचे भ्रष्ट आजचे कोरे , उडदामाजी काळे गोरे. कालचे बलात्कारी आजचे ब्रह्मचारी. कालचे कनिष्ठ आजचे श्रेष्ठ. कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे. कालचे शत्रू आजचे मित्र, कालचे कावळे आजचे पित्र. कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे. कालचे चूक आजचे बरोबर, कालचे फरार आजचे थोर. कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे. कालचे पाप आजचे पुण्य, कालचे हतबल आजचे धन्य. कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे. कालची घाण आजचा मान, कालचा कलंक आजची शान. कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे. कालचा तमाशा आजचे कीर्तन, कालचा धिंगाणा आजचे नर्तन. कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे. काल विरोध आज पाठिंबा, काल मोर्चा आज चर्चा. काल भ्रष्ट आज कोरे, उडदामाजी काळे गोरे. काल मनाई आज रवानगी, काल अडथळे आज परवानगी. काल भ्रष्ट आज कोरे, उडदामाजी काळे गोरे. कालचे विरोधी आज सत्तेत, कालचे कफल्लक आज मत्तेत. म्हणूनच, कालचे भ्रष्ट आजचे कोरे, उडदामाजी काळे गोरे.

कविता - मनाचा मंत्र

कविता - मनाचा मंत्र  हा जेलमध्ये गेला, तो जेलमध्ये गेला, रोज कुणी ना कुणी जेलमध्ये गेला, ऐकून माझा त्रागा झाला. हाच माझा त्रागा मग, चर्चेचा धागा झाला. आई म्हणाली, याला सतत जगाची काळजी, बाबा म्हणाले, तू तुझे बघ, आजी म्हणाली, लष्कराच्या भाकऱ्या भाजू नको. आजोबा म्हणाले, हे असेच चालू राहणार. मित्र म्हणाले, हा पुढे जाऊन संत होणार. सगळ्यांची बोलणी ऐकून प्रश्न विचारला मनाला, मनाने मग मेंदूला मंत्र दिला, ह्या सगळ्याची सवय करायची असेल, दुःख करायचे नसेल तर, तूही थोडा स्वाभिमान विक, हळूहळू तूही आता थोडे खायला शिक!

कविता - ऋतू

कविता - ऋतू ऋतू बरवा कधी, ऋतू मरवा कधी, ऋतू पानापानातला रंग, गर्द हिरवा कधी. ऋतू चांदणं कधी,  ऋतू गोंदण कधी, ऋतू लेकीला दिलेले, बापाचं आंदण कधी. ऋतू ऊन कधी, ऋतू सावली कधी, ऋतू लेकरांसाठी खस्ता खाणारी, माऊली कधी. ऋतू गंध कधी, ऋतू छंद कधी, ऋतू नाती जोडणारे, अतूट बंध कधी. ऋतू उनाड वारा कधी, ऋतू पाऊसधारा कधी, ऋतू वैशाख वणव्यातला, शीतल झरा कधी. ऋतू राधेच्या प्रीतीचा रंग कधी, ऋतू प्रेमात दंग सावळा श्रीरंग कधी, ऋतू  कृष्णाच्या विरहातील, राधेचा प्रेमभंग कधी. ऋतू ज्याच्या त्यांच्या नजरेचा असतो भास, ऋतू उद्याच्या सुखासाठी असतो आजचीच आस.