Skip to main content

Posts

महात्मा गांधी जीवन आणि विचार

 महात्मा गांधी जीवन आणि विचार - ९० (भगतसिंग यांची फाशी आणि गांधीजींवर खोटे आरोप) गांधीजींनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी का रोखली नाही? असा प्रश्न ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी कृतघ्नता बाळगणारी मंडळी विचारत असतात. डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी जॉन स्कॉट ऐवजी २१ वर्षीय जॉन साँडर्सची हत्या केली. त्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधिमंडळात क्रूड बॉम्ब आणि पत्रकं फेकली. दोघांना अटक झाली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला. १२ मार्च १९३० रोजी मिठाचा सत्याग्रह सुरू झाला आणि जुलै अखेर पर्यंत गांधी आणि काँग्रेस नेत्यांसहीत ९० हजार लोकांना अमर्याद काळासाठी अटक झाली. तरीही आंदोलन थांबलं नाही, कायदेभंगाची ही चळवळ मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या. चर्चा करता यावी म्हणून आयर्विन यांनी २६ जानेवारी १९३१ रोजी गांधींची सुटका केली. ६ फेब्रुवारी १९३१ रोजी मोतीलाल नेहरूंचे निधन झाले. आणि १७ फेब्रुवारी रोजी गांधी आयर्विन यांच्यात बोलणी सुरू झाली. ही बोलणी १६ दिवस चालली. अकरा मागण्यापैकी अहिंसक मार्गाने आंदोलन करणाऱ्या काँ...

इंडिया आघाडीचे भवितव्य काय?

  इंडिया आघाडीचे भवितव्य काय? मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकीची रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मतमोजणीत जे निकाल समोर आले त्यावरून हिंदी पट्ट्यातील विशेषत: गाय पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या राज्यांनी भाजपला भाजपच्याही अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने कौल देऊन गायपट्ट्यातील भाजपचे वर्चस्व सिद्ध केले आहे. असे असले तरी त्यामुळे काँग्रेस पुढील आव्हाने जास्त मोठी असल्याचे दिसून आले. 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा सेमी फायनल म्हणून बघितल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिणेतील तेलंगणामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमताने कौल देऊन दक्षिण भारतातून भाजपची आणि उत्तर भारतातून काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी त्यामुळे देशाची उत्तर व दक्षिण अशी विभागणी झाल्याचे प्रथमत: दिसून येते. ही नाही म्हटले तरी "भारतीय संघराज्य" अशी संरचना असलेल्या लोकशाहीच्या दृष्टीने तितकीच चिंतनीय बाब आहे. याचे भाजप आणि काँग्रेस तसेच इतर राजकीय पक्षांना काही सोयर सुतक असेल असे सध्या तरी वाटत नाही.  पण या प्रश्नाकडे वेळीच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे...

विक्रम वेताळ कथा 55

  विक्रम वेताळ कथा:   नव्या देशाची मागणी या वेताळाला आपण कधी पकडून शकू की नाही,  या विचारात असलेल्या राजा विक्रमाला अचानक लक्षात आले की, आज अमावस्या आहे. त्यातही 'सोमवती अमावस्या म्हणजे चांगलाच मुहूर्त!' हे लक्षात घेऊन आज काहीही करून वेताळाला पकडायचेच, असा पक्का निर्धार करून विक्रम राजाने घाईगडबडीने  आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी वेताळाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची चूक यावेळी करायची नाही, असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. रात्रीच्या गडद अंधारातही पांढऱ्या केसाचा वेताळ वडाच्या  झाडाला उलटा लटकलेला त्याला दिसला. वेताळानेही विक्रम राजाला पाहिले आणि काहीही झाले तरी आज याला आपल्या पाठीवर बसू द्यायचे नाही,  या विचारात असलेल्या विक्रम राजाच्या डोळ्याचं पातं लवण्याच्या आत वेताळाने चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले. वेताळ दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, आज तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची तात्काळ हजार शकले होऊन तू इथेच गतप्राण ...

गर्मी: लोकशाहीतील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण

गर्मी: लोकशाहीतील चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेचे प्रभावी चित्रण  भारतीय चित्रपट सृष्टीतील विशेषता हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आश्वासक नाव म्हणून तिगमांशू धुलिया या दिग्दर्शकाकडे पाहिले जाते. भारतीय समाजव्यवस्थेचे, समाजव्यवस्थेतील घटकांचे,  व्यवस्थेचे चालक-मालक आणि त्या व्यवस्थेला बळी पडणारे यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार यांच्यामध्ये तिग्मांशू  धुलिया हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते त्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतीमुळे! दिलसे या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा  हा प्रवास पानसिंग तोमर, साहेब बीबी और गँगस्टर, हासिल, चरस, गॅग्ज ऑफ वासेपुर, शहीद, मांझी : द माउंटन मॅन यासारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटातून अत्यंत प्रभावीपणे  आपल्यासमोर  येतो. भारतीय चित्रपटसृष्टीची विशेषता हिंदी चित्रपटांची एक व्यवस्था असून या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचे चित्रपट बनवायचे याची एक मर्यादा घालून दिलेली आहे.  त्यातही विशिष्ट विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी सत्तेच्या माध्यमातून  चित्रपटसृष्टीत हस्तक्षेप  केल्याने चित्रपटांतून सत्य पर...

दहाड: साखळी हत्याकांडा (सिरीयल किलींग) मागील मानसिकतेचे प्रभावी चित्रण:

  साखळी हत्याकांडा (सिरीयल किलींग) मागील मानसिकतेचे प्रभावी चित्रण: रॉबर्ट रेसलर हे अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन अर्थात एफबीआयचे एक सन्माननीय आणि तज्ञ सदस्य. 1982 साली त्यांनी साखळी हत्याकांडातील गुन्हेगारांच्या मानसिकतेवर सखोल संशोधन करून त्याआधारित गुन्हेगारांची मानसिकता हा सिद्धांत मांडला. त्यानुसार सिरीयल किलरच्या मानसिकतांचा अभ्यास करताना जे वेगवेगळे सिद्धांत त्यांनी मांडले त्यामध्ये अमेरिकेत आणि इतरत्र झालेल्या साखळी हत्याकांडांमध्ये विविध गुन्ह्यांचे स्वरूप आणि गुन्हेगारांची मानसिकता त्यांनी अभ्यासली आणि त्यानुसार गुन्हेगारांच्या वर्तणुकीचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. त्यामध्ये बहुतांश गुन्हेगार साखळी हत्याकांड घडवून आणत असताना अत्यंत थंड डोक्याने हे काम करत असतात असे त्यांना आढळून आले. यातील बहुतांश गुन्हेगारांचा  सामाजिक आणि आर्थिक स्तर उच्च असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ज्या कुटुंबांमध्ये आर्थिक सुस्थिती बरोबरच कौटुंबिक दुभंग जास्त आहे अशा कुटुंबातील मुले साखळी हत्याकांडातील गुन्हेगार असल्याचे त्यांच्या निदर्शना...

मिले सुर मेरा तुम्हारा …

 सुर की नदिया हर दिशा से बह के सागर में मिले बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मिले सुर मेरा तुम्हारा … (कश्मीरी) चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़ इक-वट बनि यि सॉन्य् तरज़ (पंजाबी) तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल मिलके बणे इक नवा सुर ताल (हिन्दी) मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा (सिन्धी) मुहिंजो सुर तुहिंजे साँ प्यारा मिले जडेंह गीत असाँजो मधुर तरानो बणे तडेंह (उर्दू) सुर का दरिया बह के सागर में मिले (पंजाबी) बदलाँ दा रूप लैके बरसन हौले हौले (तमिल) इसैन्दाल नम्म इरुवरिन सुरमुम नमदक्कुम तिसै वॆरु आनालुम आऴि सेर मुगिलाय मऴैयय पोऴिवदु पोल इसै नम इसै… (कन्नड) नन्न ध्वनिगॆ निन्न ध्वनिय, सेरिदन्तॆ नम्म ध्वनिय (तेलुगु) ना स्वरमु नी स्वरमु संगम्ममै, मन स्वरंगा अवतरिंचे . (मलयालम) निंडॆ स्वरमुम् नींगळुडॆ स्वरमुम् धट्टुचॆयुम् नमुडॆय स्वरम . (बाङ्ला) तोमार शुर मोदेर शुर सृष्टि करूर अइको शुर (असमिया) सृष्टि हो अइको तान (उड़िया) तोमा मोरा स्वरेर मिलन सृष्टि करे चालबोचतन (गुजराती) मिले सुर जो थारो म्हारो बणे आपणो सुर निरालो (मराठी) माँझा तुमच्या जुलता ...

स्वास्थ्य दोहावली

 "स्वास्थ्य दोहावली" पानी में गुड डालिए,  बीत जाए जब रात! सुबह छानकर पीजिए,  अच्छे हों हालात!! धनिया की पत्ती मसल, बूंद नैन में डार! दुखती अँखियां ठीक हों, पल लागे दो-चार!! ऊर्जा मिलती है बहुत, पिएं गुनगुना नीर! कब्ज खतम हो पेट की,  मिट जाए हर पीर!! प्रातः काल पानी पिएं,  घूंट-घूंट कर आप! बस दो-तीन गिलास है,  हर औषधि का बाप!! ठंडा पानी पियो मत,  करता क्रूर प्रहार! करे हाजमे का सदा,  ये तो बंटाढार!! भोजन करें धरती पर,  अल्थी पल्थी मार! चबा-चबा कर खाइए,  वैद्य न झांकें द्वार!! प्रातः काल फल रस लो,  दुपहर लस्सी-छांस! सदा रात में दूध पी,  सभी रोग का नाश!! दही उडद की दाल सँग,  प्याज दूध के संग! जो खाएं इक साथ में,  जीवन हो बदरंग!! प्रातः- दोपहर लीजिये,  जब नियमित आहार!                                                  तीस मिनट की नींद लो,  रोग न आवें द्वार!! भोजन करके रात में,  घूमें कद...