Skip to main content

Posts

सुपर ३० आणि समाजव्यवस्था:

सुपर ३० आणि समाजव्यवस्था:               भारतीय चित्रपटसृष्टीचे आणि त्यातही बॉलीवूडचे एक वैशिष्ट्ये राहिलेले आहे. ते म्हणजे बॉलीवूडने नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजमनाचा आरसा दाखविला आहे. तरीही काही अपवाद वगळता बॉलीवूडने तयार केलेल्या चित्रपटांवर नेहमीच टीका होत राहिली आणि त्यात तथ्यही आहे. बॉलीवूडने वेगवेगळ्या विषयाला हात घालून ते गंभीरपणे मांडले असले तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिलेले आहे कारण त्यामागे असलेली आर्थिक गणिते, बाजारपेठेची मागणी आणि वर्चस्वाचे राजकारण. परंतु इकडून तिकडून विषय उचलून त्याचा विचका करण्यात आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक धन्यता मानत असतानाही काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत  आर्थिक गणिते आणि वर्चस्वाचे राजकारण याची तमा न बाळगता वेगळे आणि ज्वलंत विषय समर्थपणे हाताळत आहेत. विशेष म्हणजे आशय-विषय चांगला असलेल्या या चित्रपटांना वास्तवातील घटनांची जोड दिल्याने व्यावसायिक यशही मिळाले आहे. गेल्या महिन्यात आलेला "आर्टिकल १५" आणि नुकताच प्रदर्शित झालेला "सुपर ३०" हे दोन्ही चित्रपट ज्वलंत सामाजिक प्रश्न मांडणारे असूनही व्यावसाय...

आर्टिकल 15 आणि आपण

"आर्टिकल १५ आणि आपण" ©के.राहुल 9096242452 "आर्टिकल 15" या चित्रपटावर आतापर्यंत बऱ्याच जणांकडून बरेच काही बोलून आणि लिहून झाले आहे. इतके की चित्रपटगृहात चित्रपट पहायला जावे की नाही? (सगळी कथा आणि प्रसंग चर्चेतून समजल्याने) अश्या द्विधा मनस्थितीत असतानाच या चित्रपटाशी निगडित एक बातमी ऐकायला मिळाली ती म्हणजे ब्राह्मण महासंघाने चित्रपटाविरुद्ध टाकलेली आणि न्यायालयाने तितक्याच तातडीने फेटाळली याचिका. याचिकाकर्त्यांच्या मते चित्रपट सामाजिक सलोखा धोक्यात आणणारा आणि ब्राह्मणविरोधी आहे. सर्व देशभर सिनेमागृहात चित्रपट प्रसारण शांततेत सुरू आहे आणि त्याला प्रेक्षकांचा विशेषतः नव्या पिढीचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून योग्य तीच भूमिका पार पाडली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचेही अभिनंदन! तसे पाहायला गेले तर उठसूट कशानेही आणि कोणाच्याही भावना दुखवण्याच्या काळात असल्या गोष्टी घडणे स्वाभाविकच! त्यामुळे हा चित्रपट आवर्जून पहायला हवा असे वाटले.  जाती आणि वर्णव्यवस्था ही आपल्या समाजव्यवस्थेची व्यवच्छेदक लक्षणे आहेत आणि त्यात काही विशिष्ट वर...

पावसाच्या कविता

एकटाच घरात मी असताना, भिंती विचित्र वागल्या. एकटाच पावसात भिजताना, तुझ्या आठवणी जागल्या. --------------------------- चिंब पावसात भिजताना, आठवणी जाग्या झाल्या. कंठ झाला अबोल, अन कडा पापण्यांच्याओल्या. -------------------------------- आठवणी झाल्या धूसर, तरी पाऊलखुणा गडद होतात . क्षण एकत्र घालवलेले, मातीमध्ये मुरत जातात. -----------------------------

शिवकालीन वजने(मापे

शिवकालीन वजने(मापे) अठवे- शेराचा 1/8 अडशेरि- अडीच शेर अदपाव- अर्धा पावशेर अदमण- अर्धा मण अदशेर- अर्धा शेर अधोली- अर्धी पायली अंजली- ओजळभर पानी आटके- अर्धा शेर आढक- चार शेर, पायली कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण कार्त- पाव रत्तल किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे कुडव- आठ शेर कुंभ- वीस खंडी कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी कोड- खंडी, वीस मण कोळवे- शेराचा अष्ठमांश खारी- 16 द्रोण, एक खंडी गरांव- अर्ध गूंज माप गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप गुंज- एक वजन परिमाण चंपा- दोन शेर धान्याचे माप चवाटके- छटाक चवाळामण- एक प्रकारचा मण चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण चाळीसा- चाळीस शेरांचे माप चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप चिपटे- पावशेराचे माप चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग चोथवा- एक पायली चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके चौशेरी- चार शेरांचे माप छटाकी- छटाक छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन टवणा- पांच शेरांचे माप टांक- एक तोळा टिपरी- मापी पावशेर टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा ...

निबंध- माझा दादा

निबंध - माझा दादा मला एक मोठा भाऊ आहे त्याला मी दादा म्हणते आई  त्याला लाडाने बाबू म्हणते तर  बाबा त्याला "घाईत झाल्यालं" असे म्हणतात. लाडावरून आठवले आई वैतागली की त्याला "बापाच्या अतीलाडाने बिघडलाय" असे म्हणते. दादा माझाही खूप लाड करतो. कॉलेजवरून येताना रोज माझ्यासाठी चॉकलेट आणतो. चॉकलेटवरून आठवले, एकदा मला दादाच्या कपाटात एक वेगळाच चॉकलेट बॉक्स सापडला.  मी त्यातील एक फोडुन बघितले तर त्यात एक "बलून" होता. माझ्या हातात तो बलून बघून दादा खूपच घाबरला. "हा मोठ्या माणसांचा बलून आहे, लहान मुलांनी त्याला हात लावायचा नसतो!" असे म्हणून त्याने तो हिसकावून घेतला. मी बलून बद्दल आई बाबांना सांगू नये म्हणून दादा आता रोज चॉकलेट ऐवजी मला मोठी कॅडबरी आणून देतो. काल रात्री झोपताना तसाच बलून मी बाबांच्या उशीखालीही पहिला. मग मी दादाला म्हणाले, "तुझ्याकडे एवढे बलून आहेत तर बाबांना पण थोडेसे दे ना". तर दादा नुसताच हसला. हसण्यावरून आठवले, दादा रोज आमच्या शेजारच्या मोहिनीकडून बघून हसत असतो. तीही येता जाता दादाकडे बघून सारखी लाजत असते. दादा रोज तिला नोट्स द...

निबंध- माझे बाबा

निबंध- माझे बाबा, नमस्कार, मी इयत्ता चौथीत आहे. माझे नाव मोना आहे पण लाडाने मला सगळे चिंगी म्हणतात. लाडावरून आठवले, बाबा आईशी खूप गोड बोलायला लागले की आई म्हणते,"जास्त लाडात येऊ नका, मला तुमचे सगळे धंदे ठाऊक आहेत". त्यावर बाबा म्हणतात, "अंग टेरेसवर चिमन्यांना पाणी ठेवणे यात कसला आलाय धंदा!" त्यावर आई म्हणते, "त्या शेजारच्या टवळीला बघण्यासाठी तुम्हांला रोज चिमण्यांचा पुळका येतो". पुळक्यावरून आठवले, मंगी माझ्या वर्गात आहे. ती मामाकडे शिकायला असते. तिची आई माहेरी आली की बाबांना तिचा पुळका येतो. ते लगेच त्याचं सामान उचलायला जातात. ती बाबांना मामा म्हणते. तर बाबांचे मित्र मंगीच्या आईला बाबांचे सामान म्हणतात. आई बाजारावरून आली की मला "चिंगे सामान घरात ने असे म्हणते!". मग मला प्रश्न पडतो, सामान म्हणजे नक्की काय? एकदा मंगीची आई घरी आल्यावर मी आईला "बाबांचं सामान आलंय", असं म्हणलं. आणि आई बाबांचं कडक्याचं भांडण झालं. बाबांना गोठ्यात झोपावं लागलं. झोपण्यावरून आठवलं. मी रोज आई बाबांच्या मध्ये झोपते पण सकाळी उठल्यावर मी एका बाजूला असते. बाबा म्हण...

गांधी समजून घेताना.........

गांधी समजून घेताना........ *गांधी समजून घेताना…* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 #1 खुद्द बापूंनी बालपणी अनुभवलेल्या गोष्टींमधूनही त्यांना जगण्याचे धडे मिळाले होते. गांधींनी लहानपणी 'श्रावणबाळ' नाटक पाहिलं होतं आणि त्यांच्या मनात मातृ-पितृसेवाभाव जागृत झाला होता. कदाचित त्याचमुळे आजोबा ओताबाबा व पिताजी कबा आजारी असताना त्यांच्या सेवेसाठी गांधी शाळेतून पळत यायचे. यातूनच गांधींना आजारी माणसाची सेवा करायची सवय जडली. आजार्यांची सेवा करता करता ते रुग्णांचे वैद्य बनले. कबा गांधींकडे अनेक धर्मपंथांचे साधुसंत यायचे. त्यांची धार्मिक चर्चा गांधींच्या कानावर पडायची. अशा चर्चेतून त्यांनी पैगंबरांची कथा ऐकली. पिताजींचे पाय दाबता दाबता त्यांनी रामायण ऐकलं. जैन परिवारांशीही गांधींचे स्नेहपूर्ण संबंध जडले. गांधींजींची माता पुतळाबाई ही उदार संप्रदायाची होती. या संप्रदायाचे मुख्य गुरू अरबी, पारशीतून लिहायचे. त्यामुळे या भाषांचही परिचय गांधींना झाला. गांधींचा परिवार वैष्णव असला, तरी अनेक धर्मांचा आदर करायचा संस्कार गांधींना घरातल्या अशा वातावरणातून मिळाला. (श्री. नारायणभाई देसाई यांच्या "अज्ञात गांधी...