Skip to main content

Posts

नेहरुवाद : आयडिया ऑफ इंडिया ! - श्रीरंजन आवटे

  -------------------------------------------- *नेहरुवाद : आयडिया ऑफ इंडिया !* ------------------------------------------- भाग -1 अलीकडच्या काही वर्षात सर्व प्रश्नांचं मूळ नेहरुंमध्येच आहे, असं बिंबवण्यासाठी पराकाष्ठा सुरु आहे; मात्र या अपप्रचाराच्या तोफेतूनही नेहरुंचे बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि समग्र जीवनदृष्टी याच बाबी अधोरेखित होत राहतात. त्यामुळेच त्यांच्या काळाहूनही आज नेहरुंचे संदर्भमूल्य अधिक जाणवते  आहे.  विसाव्या शतकाच्या मध्यावर विशेषतः दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्या. यातील बहुतांश राष्ट्रांमध्ये एकाधिकारशाही, लष्करशाही निर्माण झाली. लोकशाही हेलकावे खाऊ लागली. या राष्ट्रांच्या स्वातंत्र्योत्तर राजकीय प्रवासाच्या आलेखावर नजर टाकली असता भारताचे वेगळेपण ठळकरित्या लक्षात येते.  या अभूतपूर्व वेगळेपणात नेहरुंचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ९ वर्षे तुरुंगात असलेला माणूस स्वतंत्र भारताचा १७ वर्षे पंतप्रधान होता. त्यामुळे नेहरु हा स्वातंत्र्यपूर्व भारताला स्वातंत्र्योत्तर भारताशी जोडणारा पूल होता. या भक्कम पुलाम...

माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा.

माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा.....भाग १ प्रत्येक नात्यात म्हणजे अगदी मैत्रीत, नवरा-बायकोत, आई-मुलीत, भाव-बहिणीच्या नात्यात... अगदी कोणत्याही नात्यात एकमेकांसाठी आदर, एकमेकांसाठी प्रेम,एकमेकांची जाणीव,  एकमेकांसाठी space, एकमेकांप्रती जबाबदारीची जाण, आणि ती प्रत्यक्षात क्रुतीपुर्ण देणं घेणं, empathy अशा क्षमता लागतात.... त्या दोन्ही बाजूंनी असतील तर नात फुलत,टिकत आणि खर खर बहरत....  कोणतीही दोन माणस एकत्र आली की वाद संवाद, मतभेद हे होत राहतात... चुका होतात....पण एकमेकांशी बोलत सामोपचाराने हे छोटे छोटे विसंवाद संपवता आले तर चांगलं आहे..... एकमेकांना माफ करत , एकमेकांची माफी मागत जी नाती आनंदी वातावरणात परिपक्व होत जातात...mature होतात.... ती एकमेकांना ओझ होत नाहीत हे आहे forgive and forget Self actualization काही माणसं समोरचा कसा ही असला तरी नात्यात comfortable रहातात....समोरच्या माणसाला आहे तसा खरोखर स्वीकारतात....आणि स्वतः ला त्रास करून न घेता समोरच्या माणसाला योग्य पद्धतीने हाताळतात ....  forgive and forget इथे ही होताना दिसत... माणूस मनातून जे...

संत रवीदासांचे क्रांतिकारक विचार!

  संत रवीदासांचे क्रांतिकारक विचार! प्रस्तावना: भारतीय प्रमुख संतांमध्ये ज्या संतांचे नाव अग्रभागी घेतले जाते त्यामध्ये संत रवीदासांचे नाव अग्रभागी आहे. जन्माने दलित असलेल्या रविदास यांची जन्मतारीख निश्चितपणे सांगता येत नसली तरी त्यांचा जन्म साधारण 1450 मध्ये झाला असा त्यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि तज्ञांचा कयास आहे. रघुराम आणि  घुरबिनिया या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या रवीदासांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसीच्या जवळ असलेल्या श्री गोवर्धन या गावी झाला. हे ठिकाण सध्या त्यांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते. रवीदासांच्या वडिलांचा चामडे कमविण्याचा व्यवसाय होता आणि ते मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून बनविले जात असे. या व्यवसायाकडे हीन नजरेतून पाहिले जात असल्यामुळे त्यांची, त्यांच्या परिवाराची आणि हा व्यवसाय करणाऱ्या चमार (अर्थातच चांभार) या जातीची अस्पृश्य जातीत गणना केली जात असे.  शूद्र म्हणून गणले जात असले तरी जन्मापासूनच रावीदासांचा स्वभाव, वर्तन आणि समज आध्यात्मिक विचारांच्या जवळ जाणारे होते. त्यामुळे अगदी लहानवयातच ते उत्तरप्रदेशातील भक्ती चळवळीच्या  प्रभावाखाल...

कविता- बुद्ध एकदा समजून घे!

 तु राम होऊ नको मला सीता होणं जमणार नाही माझ्याच्यानं अग्निपरिक्षा देणं तर होणारच नाही आणि तुझ्याविना तर सोडच तुझ्यासोबतचाही वनवास जमणार नाही लग्नात घेतलेल्या सप्तवचनातलं 'जन्मभर तुला साथ देईन'  हे वचन पाळता न आलेल्या तुला  माझ्याच्याने एकवचनी न्यायनिष्ठ म्हणणं होणारच नाही... तु लक्ष्मणही होऊ नकोस मला उर्मिला होणं जमणार नाही राजवाड्यातली सुखं टोचतील मला बंधुप्रेमाचं वचन पाळताना सप्तपदीतलं तेच सात जन्माच्या सोबतीच वचन तु ही तुझ्या भावासारखंच कोलून दिलंस विरहात जळत तुला श्रेष्ठ बंधुप्रेमी म्हणणं मला जडच जाईल.... तु बुद्धही होऊ नकोस मला यशोधरा होणं जमणार नाही दुःखाचं मुळं शोधायला घर सोडणाऱ्या तुला ते भेटणार नाही कारण तु ते माझ्या हृदयात घर सोडताक्षणी ठेऊन जाशील शांततेच्या प्रेमात असणारा तु माझ्या मनातला गोंधळ ऐकुही शकला नाहीस ज्या गोष्टींच्या शोधार्थ तु गेलास  त्याच गोष्टी माझ्याजवळ सोडून गेल्यानं त्याचं ज्ञान तुला झालं हा दावा मी खोटा पाडीन आणि सप्तपदीत तुला दिलेलं विश्वासार्हतेचं वचन माझ्याकडुन मोडलं जाईल तु तरी साथ देण्याचं कुठं पाळलंस हां,व्हायचंच असेल तर तुकाराम ह...

महामनाव लेखमाला

*लेख पहिला*  * तथागत गौतम बुद्ध* *प्रस्तावना* भारताने जगाला अनेक महान गोष्टी दिल्या आहेत, जीवनाच्या विविध बाबींवर नावीन्यपूर्ण भाष्य करणारी माणसं दिली आहेत. आखिल जगाला स्वातंत्र्य, समता अन बंधुतेचा मूलमंत्र देणारे शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे त्यात सर्वोच्च आहेत. डॉ. आ. ह. साळूंखे यांनी 'सर्वोत्तम भूमिपुत्र' या शब्दांत त्यांचे वर्णन केलेले आहे. प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील स्वातंत्र, समता अन बंधुतेचा अग्निस्त्रोत असा बुद्धांचा उलेख करतात. तथागतांच्या आसपासही जाणारे व्यक्तित्व आजवर भारतानेच नाही तर जगाने जन्माला घातलेले नाही असे आचार्य रजनीश म्हणतात. तर गौतम बुद्धांच्या हृदयाचा एक अंशही मला मिळाला तर मी स्वत:ला धन्य समजेन असे महाकरुणिक बुद्धांच्या महतीचे वर्णन स्वामी विवेकानंद करतात. महामानव हे कुठून आकाशातून कोसळत नसतात किंवा जन्मत:च महामानव म्हणून प्रकट होत नसतात. त्यांच्या महामानव होण्याला तत्कालिन सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी असते. या संघर्षाचे त्यांच्या जानीवांनी केलेले आकलन, या संघर्षात त्यांनी मानवतेच्या बाजूने पार पाडलेली भूमिका अ...

कविता - एकदा प्रेम करून बघ!

  कविता - एकदा प्रेम करून बघ! शिरो वापरला तर मुडदे पाडाल,  जीन्स घातली तर मुडदे पाडाल, बुरखा घातला म्हणून मुडदे पाडाल, पाय उघडे ठेवले म्हणून मुडदे पाडाल, पदर पडला म्हणून मुडदे पाडाल, बोलले म्हणून मुडदे पाडाल, बोलले नाही म्हणून मुडदे पाडाल, हसले म्हणून मुडदे पाडाल, मोबाईल जवळ बाळगला म्हणून मुडदे पाडाल, प्रेम केले म्हणून मुडदे पाडाल, नोकरी करते म्हणून मुडदे पाडाल, घरीच असते म्हणून मुडदे पाडाल, या ना त्या कारणाने मुडदे पाडाल, धर्माच्या नावाखाली मुडदे पाडाल, अधर्म झाला म्हणून मुडदे पाडाल, तुम्ही आमचे मुडदे पाडनारच, कितीही झाकलं तरी आणि नाही झाकलं तरी, आमचं अस्तित्व आहे म्हणूनच तर मुडदे पाडाल, पण आमच्या जन्माच्या अगोदरही आमचे मुडदे पाडाल, पण सत्य मात्र हेच आहे की- तुम्ही आमच्या शिरोला घाबरता, आमच्या जीन्सलाही घाबरता, आमच्या पदर पडण्याला ही घाबरता, आमच्या बुरख्यालाही घाबरता, आम्ही शांत असलो तरी तुम्ही घाबरता आणि आम्ही बोललो तरीही, आम्ही शिकतोय म्हणून तुम्हांला धडकी भरते आणि नाही शिकलो तरीही, तुम्हांला आमच्या नोकरीचीही भीती वाटते आणि घरी असण्याचीही, आमच्या विरुद्ध बोलणाऱ्यांनो तुमच्य...

संविधानाच्या मार्गानेच जावे लागेल!

  संविधानाच्या मार्गानेच जावे लागेल! 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत स्वतंत्र झाला याला 75 वर्षे पूर्ण होतील. म्हणजेच हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे हिरकमहोत्सवी वर्ष आहे.  एका अर्थाने भारतीय समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था,  राजकीय व्यवस्थेच्या आणि प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्थेच्या प्रगल्भतेचा हा सर्वोच्च बिंदू ठरायला हवा. जगातील अनेक लोकशाही व्यवस्था विशेषतः युरोप आणि पश्चिमात्य देशातील अर्थव्यवस्था एवढयाच कालावधीत प्रगल्भावस्थेत जाऊन स्थिरावल्या त्या आजतागायत कायम असून त्यांनी विकासाच्या वाटेवर कायम राहताना लोकशाही मूल्ये फक्त जपलीच नाहीत तर संपूर्ण व्यवस्थाच समाजकेंद्रित करून ती येत्या काळात अधिकाधिक लोकाभिमुख कशी राहील यासाठी भरीव प्रयत्न केले आणि ते लोकांच्या सहकार्याने फलद्रूपही झाले.  भारताच्या बाबतीत मात्र भारतीय लोकशाहीव्यवस्था देशात टिकून असली तरी 75 वर्षानंतरही म्हणावी तितकी प्रगल्भ झाल्यासारखी वाटत नाहीत. गेल्या 7-8 वर्षात तर भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा पायाच डळमळीत झाला आहे की काय? अशी शंका आणि भीती वारंवार मनात निर्माण होते. अर्थात त्याला कारणीभूत असलेल्या अनेक घटका...